वेळीअवेळी
आकाश नुसतेच दाटून येते
एकदाचे हमसून बरसत नाही.
लेखणी कुंद कुंद :
नुसतीच ठिबकते ; झरत नाही.
रक्तरेषा :
उभ्या, आडव्या, तिरप्या
भावनेच्या भरातले अर्धेमुर्धे वार
कागदाच्या काळजात धारदार ..
असे स्वतःचेच कैक खून वेळीअवेळी...!
डॉ. सुनील अहिरराव
आकाश नुसतेच दाटून येते
एकदाचे हमसून बरसत नाही.
लेखणी कुंद कुंद :
नुसतीच ठिबकते ; झरत नाही.
रक्तरेषा :
उभ्या, आडव्या, तिरप्या
भावनेच्या भरातले अर्धेमुर्धे वार
कागदाच्या काळजात धारदार ..
असे स्वतःचेच कैक खून वेळीअवेळी...!
डॉ. सुनील अहिरराव
आणि तरीही आपण जिवंत असतो …… हे आश्चर्यच !
उत्तर द्याहटवाहो,संवेदनशील माणसांना रोज कैक वेळा मरण्याची सवय होऊन जाते !
उत्तर द्याहटवा