भावनांतील दुबळा गुंता आपणालाच गुंतवू जातो
तुटली स्वप्नं, किनारा छिन्न- आपणासवे वाहून नेतो
वाहतो असे: पागल पिसे ,कणाकणाला विखरु जातो
सांडती कण नुरते भान, अज्ञातातील प्रदेश येतो.
गहिरागार गूढ अंधार : अस्तित्वातील अर्थ सांगतो
राखेतून या कलेवराच्या जीवनसाक्षी फिनिक्स होतो !
- डॉ.सुनील अहिरराव
पूर्वप्रकाशित (सकाळ,नाशिक )

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा